मेसचा डबा खाऊन संपला तेव्हा आपण अंमळ जास्तचं जेवल्याची जाणीव त्याला झाली. काल अर्धवटं राहिलेली एक कथा वाचून संपवली तेव्हा खूप काही चांगलं वाचल्याच्या तृप्तीनं त्याचं मन भरून आलं. त्याला कुणाशीतरी बोलायची तीव्र इच्छा झाली.
रूम पार्टनर अभ्यासाचं पुस्तक समोर धरून फोनवर बोलण्यात मग्न होता. त्यानं स्वतः:चा फोन उचलला आणि वाचलेल्या कथेविषयी आता बोलू शकू अशा एखाद्या मित्राचा नंबर शोधू लागला. नंबर डायल करून त्यानं फोन कानाला लावला.
"हॅलो मी बोलतोय."
"अरे वा! बऱ्याच दिवसांनी."
तो मनातल्या मनात म्हणाला हा शेवटचे दोन फोन विसरला वाटतं. विसरणारंच म्हणा कारण दोन्ही वेळेस पठ्ठ्या मीटिंगमुळे "अरे बिझी आहे. नंतर कॉल करतो" या एक वाक्याच्यावर बोलला नव्हता.
"काही नाही रे... सहजंच... कसं चाललयं तुझं?"
"मस्त मजेत... तुझं काय चाललयं?"
"विशेष काही नाही... नवीन काय वाचलंस?"
"सध्या सर्टिफिकेशनची तयारी चालू आहे. या विकएण्डला आहेत पेपर."
"ओके..... म्हणजे बिझी दिसतोयस..."
"हो रे... सध्या जरा बिझीच आहे. मी नंतर कॉल करतो तुला"
"ओके. चल बाय."
"ओके. बाय."
दुसऱ्या एका मित्राबरोबरपण असंच काहीसं संभाषण झालं. तो मित्र जिमॅटच्या तयारीत बिझी होता.
त्यानं लॅपटॉप उघडला आणि गूगल टॉक उघडलं. एक मित्र आणि मैत्रीण असे दोघजणं ऑन लाइन दिसतं होते. त्यानं मित्राला "हाय" असा मेसेज टाकला आणि उत्तराची वाट बघत तो थांबला. तब्बल पाच मिनिटं वाट बघितल्यानंतर त्यानं मैत्रिणीला तसाच मेसेज टाकला आणि पुढच्या पाच सेकंदातच तिचं स्टेटस "बिझी" दिसायला लागलं. वेदनेची एक तीव्र कळ त्याच्या काळजात उमटली. आपल्याला टाळत तर नसेल ना ती अशी दाट शंका येऊन त्याची विचित्र तगमग व्हायला लागली.
तो विचार करू लागला. हे असं आजकाल नेहमीच होतं. एखाद चांगल साहित्य वाचल्यावर, चांगला चित्रपट बघितल्यावर किंवा असंच एखाद्या विषयावर काही बोलावसं वाटलं की कुणी सापडतचं नाही. एवढे मित्र आहेत पण संवादाची भूक बऱ्याच वेळी भागतंच नाही. ज्या व्यक्तींशी खूप बोलावंस वाटतं त्या व्यक्ती आपल्याला टाळताहेत अशी दाट शंका यायला लागते किंबहुना तशा प्रकारचे इशारे त्या लोकांकडून मिळायला लागतात. हे खूपच वेदनादायक असतं. पूर्वी फोन नव्हते त्याकाळी लोक एकमेकांना आवर्जून भेटायला जायचे. तसल्या भेटींमधून मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. आता त्याकाळीसुद्धा नकोशा व्यक्तींची टाळाटाळ होतंच असेल पण एखादं माणूस आपल्याला एवढ्या लांबून भेटायला आलं आहे तर त्याला थोडा वेळ देण्याचं सौजन्य लोकांमध्ये असायचं. मग फोन आले, आणि पाठोपाठ इंटरनेट आयुष्यावर येऊन कोसळलं. आपल्यासारख्या काही भाबड्या जिवांना वाटलं चला आता मित्र फोन डायल करण्याच्या अथवा माउस क्लिक करण्याच्या अंतरावर आले. पण झालं भलतंच. फोनवर आणि चॅटींग करताना सर्रास खोटं बोललं जाऊ लागलं. आता उगाच त्या फोन किंवा इंटरनेटसारख्या निर्जीव गोष्टींना दोष देण्यात काय हशील. कारण या माध्यमांनी माहिती आदान प्रदान करण्याचा वेग व क्षमता वाढविण्याच्या संदर्भातलं आपलं काम निर्विवादपणे चोख बजावलं. माणसाच्या माहितीची भूक अपेक्षेपेक्षा जास्तचं भागली (अगदी सरकारंसुद्धा माहिती अधिकाराच्या नावाखाली संवेदनशील नसेल अशा म्हणजेच नको असलेल्या माहितीची खिरापत वाटायला लागली). पण मग मनाच्या कोठ्या भराभर रिकाम्या झाल्या आणि रित्याचं राहायला लागल्या. एकमेकांच्या संभाषणात माहिती चिक्कार पण संवाद अगदीच दुर्मिळ झाला. मग इमोशनल कोशंटचा नावाच्या गोष्टीचा शोध लागला. तो वाढविण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरं निघाली.
त्याच्या मनात उलट सुलट विचारांची वर्दळ उडाली.
- "मैत्री" म्हणजे कॉलेजला जायला, किंवा दारू प्यायला, किंवा सिगरेट ओढायला, किंवा पिक्चर बघायला किंवा रूम शेअर करायला लागणारी सोबत.
- "प्रेम" म्हणजे (लग्नाआधीच्या किंवा लग्नानंतरच्या) सेक्समध्ये संपणारा, जमिनीच्या दोन बोटं वरूनच होणारा रम्य प्रवास.
- "लग्नानंतरचं वेल-सेटल्ड आयुष्य" म्हणजे घर, गाडी, इन्वेस्टमेंट्स, प्रमोशन, मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांचं सेटलमेंट आणि या सर्वांना असलेली प्रतिष्ठेची झालर हे सर्व चढत्या क्रमानं मिळवण्याची आणि सांभाळण्याची एका जोडप्याची प्रचंड पराकाष्ठा.
- आणि "समाधान" म्हणजे योगाच्या व्हिडीओज बघून किंवा योगाच्या तत्सम शिबिरात असंख्य लोकांबरोबर हजेरी लावून, गुरुजींच्या शब्दाबरोबर कानातून आणि प्राणायामच्या खोल श्वासाबरोबर नाकातून आत शिरणारं अद्भुत रसायन.
अशा मजेशीर व्याख्या त्याला सुचल्या. अरबट चरबट खाल्ल्यानंतर मळमळल्यासारखं वाटत तसं त्याला असला सगळा विचार करून वाटू लागलं.
त्याला वाटलं हे सगळं एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून अथवा बोलून सांगायला किती मजा आली असती. मग त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपला ब्लॉग उघडला आणि तो टाइप करू लागला.
Saturday, December 22, 2007
Wednesday, December 5, 2007
वैताग
ऑफिसला जाताना एवढा वैताग त्याला कधीच वाटला नव्हता. नोकरी सोडुन घरची उत्तम शेती करायची रोमँटीक कल्पना त्याच्या डोक्यात असंख्य वेळा चमकुन गेली होती. पण पेपरातल्या आत्महत्त्यांबद्दल वाचुन वडलांनी आणि यंदा मुलाचे कर्तव्य आहे असा झेंडा (त्याच्या पगारपत्रकासहित) मिरवणाऱ्या आईने त्याच्या कल्पनेला डोक्याबाहेर पडु दिले नव्हते. त्यामुळे वैताग वेगवेगळ्या स्वरुपात वाढतचं होता. पण आता सगळ्याच गोष्टींचा कडेलोट होतोय असं त्याला गेले काही दिवस मुद्दामचं वाटत होतं. पण आजचा दिवस जणु आपल्यावर सूडच उगवायला उगवलाय अशी खात्रीच त्याला ऑफिसमध्ये पाउल टाकल्यापासुन झाली. आपण जागी पोहोचायच्या आधीच जर आपला बॉस आपल्या क्युबिकलमधे आपली वाट पाहत उभा असेल तर त्यासारखा मोठा अपशकुन कोणता आख्या जगात नसेल. आता चार वाजेपर्यंत काही फॉर्वर्ड्स वाचता येणार नव्हते, चॅटिंग तर लांबची गोष्ट. आता मेलबॉक्स चार दिवस मुक्ती न मिळालेल्या महानगरपालिकेच्या कचरा कंटेनरसारखा भरुन वाहणार होता. कंटेनरची आठवण होताच नाकात वास भरुन त्याचा चेहरा वाकडा झाला. नेमकी त्याची तीच भावमुद्रा टिपुन बॉसनं निदान हजारवेळा मारलेला हँगओवरचा पकावु पीजे परत मारला आणि स्वत:च आपल्या पीजेवर खुश होत ख्या ख्या करुन हासला. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या अप्रायझलची आठवण करुन त्यानं मन मारुन स्माइल केलं आणि गुडमॉर्निंग म्हटलं. ढिगभर कामाची जंत्री त्याच्या गळ्यात मारुन एक तासानी बॉस त्याच्या क्युबिकलबाहेर पडला तेव्हा त्याला आपल्या क्युबिकलवर मोठा काळा ढग बरसायच्या कमांडची वाट बघत थांबलाय असं वाटलं. काले मेघा काले मेघा पानी तो बरसा म्हणत आचकट विचकट नाचणारे लगानमधले आमिरचे सगळे गावकरी बॉसचे नातेवाइक असल्याची फालतु कल्पना त्याच्या मनात उगीचच तरळली. दुपारी टिफीन डेस्कवर यायच्या दोन मिनिटं आधी बॉस लंचनंतरच्या मिटींगची दवंडी पिटुन गेला आणि त्याचं जेवण पार अळणी होवुन गेलं. मिटींगमधे नकट्या कुरुप पोरीचा बाप असल्यासारखा बॉस कस्टमरच्या सर्व मागण्या मान्य करतचं चालला होता. टिचभर क्युबिकलमधे आणि वितभर ऑफिसमधे जन्मठेपेच्या कैद्यासारखं पिझाचे तुकडे चावत काढाव्या लागणाऱ्या पुढच्या असंख्य संध्याकाळी आणि रात्री त्याच्या नजरेसमोर तरंगल्या. मिटींगनंतरच्या इंटर्नल डिस्कशनमधे शेड्युलवर बॉसबरोबर तासभर वाद घालुन त्याचं डोकं पिकुन गेलं होतं. संध्याकाळी टिमबरोबर चहा घ्यायला टपरीवर आला तेव्हा गप्पांची सुरुवात होम लोन या त्याच्या नावडत्या विषयानेच सुरु झाली. मग कुठं बुक केला फ्लॅट असं दोघातिघांनी विचारल्यावर त्याला गावाकडं आई वडलांचं घर असुनसुद्धा उगीचचं बेघर वाटायला लागलं. चहाबरोबरच्या गप्पांचा शेवट अपेक्षित पण वैतागवाणा असा शेअर मार्केटने झाल्यामुळे त्याला आपण रेसकोर्सच्याबाहेर बसुन चणे विकणाऱ्याच्या लायकीचेच असल्यासारखं वाटलं.
संध्याकाळी ऑफिसमधला मुक्काम दहा तासापेक्षा जास्त लांबल्यानंतर आणि खिडकीतुन काळोख डोकावु लागल्यानंतर त्याचा मोबाइल वाजला तेव्हा अंमळ आश्चर्याने त्याने नंबर बघितला. नंबर ओळखीचा तर नव्हताच पण घड्याळाकडं एक नजर टाकुन हा फोन कुठल्या बँकवाल्या अक्काबायचा असणार नाही याची मनोमन खात्री करुन, एस टी डी कोड कुठला असेल असा विचार करत त्याने फोन उचलला. पलिकडचा पुरुषी आवाज अगदी परिचित नाही पण एखाद्या खोल तळाच्या पिशवीत चाचपताना वस्तु हाताला लागावी पण ती काय आहे हे कळु नये असा वाटत होता. खुप वेळ फिरकी घेवुन पलिकडच्या आवाजाने ओळख करुन दिली तेव्हा कचकुन एक शिवी त्याच्या तोंडुन बाहेर पडली आणि त्याचा आवाज उगीचच मोठा आणि मोकळा झाला. गावच्या कट्ट्यावर ऐसपैस बसावं तसा तो टेबलावरचं फतकलं मारुन बसला. काही मिनिटातचं मनाने तो त्या फोनवरच्या आर्मीतल्या मित्रांच्या सीमेवरच्या कुठल्याशा निर्जन पोस्टवरच्या बराकीत जावुन पोचला. त्याचं क्युबिकल आणि मित्रांची बराक एक तासाभरासाठी शेजारी शेजारी असल्यासारखचं वाटत होतं त्याला. इकडं हा ऑफिसमधे एकटा आणि तिकडं ति पोस्टवर एकटे. तिकडं पडणारा हिमवर्षाव आणि थंड बोचरा वारा स्वत: अनुभवत असल्यासारखं तो अंग चोरुन बसला. मित्र सुटीसाठी गावी येतायेत हे ऐकुन त्याला बऱ्याच दिवसांनी गावी जायची ओढ लागली. मित्रांच्या सुटीच्या तारखांची मनात उजळणी करत त्यानं फोन ठेवला तेव्हा त्याला जरा बरं वाटु लागलं. पँट्रीत जावुन ताजमहालच्या पिशव्या टाकुन बनवलेला चहा मायक्रोवेव्हमधे जरा जास्तच उकळुन त्याने एक घुटका घेतला. दुपारी बॉसबरोबरच्या भांडणानंतर आखलेल्या प्रोजेक्टच्या पसरट वेळापत्रकावर नजर टाकुन त्याने मित्रांच्या सुटीशी जुळणाऱ्या तारखा टिपुन एक रजेचा अर्ज भरला. तो अर्ज बॉसला (तारखांच्या स्पष्टीकरणासहीत) मेल करुन तो निघाला तेव्हा ऑफिसबाहेर पडताना एवढे प्रसन्न त्याला कधीच वाटले नव्हते.

Thursday, June 14, 2007
व्यसन
संध्याकाळचे कितीतरी वाजले असावेत. पँट्रीत जाऊन त्यानं ताजमहाल चहाच्या तीन पिशव्या कपात टाकल्या. कॊफीयंत्रातुन गरम पाणी घेतलं आणि कप परत मायक्रोवेव्हमध्ये ठेवून चहाला चांगली उकळी येऊ दिली. रंग सुधारेपर्यंत दुधपावडर टाकली आणि उगाचच म्हणून साखरेचा एकच ठोकळा कपात टाकला. हे सर्व ढवळत असतानाच त्याने डब्यातून चार बटर चकल्या टिशू कागदात घेतल्या. चकलीचा एक तुकडा तोंडात टाकत आणि चहाचा घुटका घेत तो जागेवर येऊन बसला.
आउटलुकच्या खिडकीमध्ये आठ नवीन पत्रं दिसली पण पाठवणारांची नावं कळल्यावर त्याच्या बोटांनी आपोआपच पुढची खिडकी उघडली. प्रोग्रॅमच्या त्या खिडकीत सतरा चुकांची जंत्री नजरेस पडताच त्याच्या बोटांनी एखाद्या समंजस मित्राप्रमाणे सराईतपणे एक्सप्लोररची खिडकी उघडली आणि त्याला उगाचच थोडं बरं वाटायला लागलं.
पत्त्याच्या पट्टीत ऒर्कुट्च्या संकेतस्थळाचा पत्ता टाकला गेला. आज दिवसातल्या एकोणिसाव्या वेळी ऒर्कुटचे मुखपृष्ठ उघडले गेले असले तरी मुखपृष्ठावरचे हसरे चेहरे बघून त्याला चहा निम्म्यापेक्षा जास्त संपल्यानंतर आणि बऱ्याच वेळानंतर पहिल्यांदाच तरतरी वाटली. विपत्र आणि परवलीचा शब्द टाकून कळफलकावर एंटरची कळ हात वरती घेऊन जरा जोरानंच ठोकल्यावर त्याच्या शेजाऱ्यालाही कळलं की आंतरजालावरची मुशाफिरी सुरू झाली आहे. शेजाऱ्याची नजर उगाचच आपल्याकडे वळल्याचं ध्यानात येताच खिडकीचा आकार कमी करून, प्रोग्रॅमची खिडकी नुसतीच उघडून आणि डेस्कटॊपवर उंदीर नुसताच इकडे तिकडे पळवून त्याने काम करण्याचा आभास निर्माण करायचा केविलवाणा प्रयत्न केला. मग कामाचाच एक भाग असल्याच्या आविर्भावात त्यानं एक्सप्लोररची खिडकी पुन्हा उघडली. एव्हाना ऒर्कुटमधलं त्याचं वैयक्तिक मुखपृष्ठ उघडलं होतं. स्क्रॅपच्या संख्येत गेल्या अठरा वेळी आणि आतासुद्धा एकाचीही भर पडली नव्हती. मित्रांच्या यादीकडं लक्ष जाताच दोन मित्र तब्बल दोन दिवसांनी दिसल्याचं त्याला जाणवलं. त्यांचं कसं चालू आहे हे विचारावं म्हणून त्यानं एकाचं स्क्रॅपबुक उघडलं तर त्याला स्वतःचाच तीन दिवसांपूर्वीचा स्क्रॅप रांगेत पहिल्यांदा दिसला. दुसऱ्या मित्राला "काय कसं काय?" असा स्क्रॅप टाकून तो कदाचित आपल्याला नवीन स्क्रॅप आला असेल असं वाटून जरा गडबडींतच परत आपल्या वैयक्तिक मुखपृष्ठावर आला. पण स्क्रॅपच्या संख्येत काही प्रगती नव्हती.
थोडा वेळ वाट पाहायला हरकत नसावी हे जाणवताच त्याच्या बोटांनी परत एकदा कुठल्याही आदेशाशिवाय एक्सप्लोररची आणखी एक खिडकी उघडली. याहूची पत्रपेटी पंचविसाव्यांदा उघडली गेली. पत्रसंख्येत दोनाची भर दिसताच तो जागच्या जागी उगाचच थोडा सावरून बसला. पण दोन्ही पत्रं दररोज येणारी एका बॅंकेच्या कर्जाची जाहिरातपत्रं होती.
तिसरी एक्सप्लोररची खिडकी उघडण्याआधी तो परत एकदा ऒर्कुटच्या खिडकीत आला आणि पानं ताजतवानं करून त्यानं परत एकदा स्क्रॅपच्या संख्येचा आढावा घेतला. संख्या प्रोग्रॅमच्या चुकीमुळे तीच राहिली असेल वाटून तो परत स्क्रॅपबुकमधे एक चक्कर मारून आला. तिसऱ्या खिडकीत पंधराव्यांदा रिडीफची पत्रपेटी उघडली. रिडीफचा पत्ता फारसा वापरत नसल्याने तिथे नवीन काही पत्र आले असण्याची शक्यता नव्हतीचं. आणि त्याच्या या शक्यतेचं क्षणार्धांतच सत्यतेत रुपांतर झालं.
त्याला आंतरजालाच्या अतिप्रचंड वेगाचा उगाचच रागच आला. पूर्वी नव्यानंच सुरू झालेल्या नेटकॅफेमध्ये बसून प्रत्येक संकेतस्थळ उघडताना पाहावी लागणारी वाट आणि वाट पाहताना शिगेला पोचणारी उत्कंठा यातला आनंद आपण गमावून बसल्याचं जाणवून त्याला थोडं वाईटच वाटलं.
मग त्याने रिडीफचं मुखपृष्ठ उघडून बातम्या वाचायला सुरुवात केली. चार दिवसानंतर प्रदर्शित होणाऱ्या एका गाजलेल्या नटाच्या दाक्षिणात्य चित्रपटाची माहिती देणाऱ्या चार नवीन दुव्यांची भर, त्याच्या गेल्या वाचनानंतर म्हणजेच सातव्या वाचनानंतर पडली होती. तसेच निवडणुकांची आणि भारतीय क्रिकेट संघाच्या नियमित अपयशाची चर्चा करणाऱ्या प्रत्येकी दोन नवीन दुव्यांचीही भर होती. सगळे दुवे उघडून वाचल्यासारखे करून तो परत ऒर्कुटच्या खिडकीमध्ये आला आणि ताजेतवाने करायला एफ्-५ ही कळ दाबून तो वाट बघत बसला. पण त्याला क्षणाचीही उसंत न देता तेच पान जसेच्या तसे त्याच्या डोळ्यांवर फेकले गेले. मग त्याने ऒर्कुटवरच्या त्याच्या आवडत्या कम्युनिटीमध्ये चक्कर टाकली. तिथेही चार नवीन सदस्यांचे आणखी कुठल्या वेगळ्याचे कम्युनिट्यांचे सभासद व्हायचे आमंत्रण देणारे संदेश होते.
ऒर्कुटमधे असतानाचं त्याला डेस्कटॊपवरचं चित्रं बदलायची कल्पना सुचली. त्याने लगेच गुगलचे संकेतस्थळ उघडून पटापट सात आठ वेगवेगळ्या खिडक्या उघडून मनासारखे चित्रं शोधायला सुरुवात केली. चाळीसएक चित्रं चाळल्यानंतर त्याला मनासारखं चित्र सापडलं आणि दिवसातला तिसरा डेस्कटॊपचा चित्रबदल त्यानं अमलात आणला.
इ-सकाळ उघडून काही भर पडली आहे का याची तपासणी करून आणि एक दोन बातम्या परत वाचून त्यानं मनोगतावर एक चक्कर टाकली. दोन नवीन आलेल्या कविता वाचून त्या कळल्या नसल्यातरी काहीतरी नवीन घडल्याचं समाधान त्याला उगाचच वाटून गेलं.
तेवढ्यात प्रकल्प व्यवस्थापक येताना दिसताच अगदी काही घडलंच नसल्याच्या आविर्भावात त्यानं साळसुदपणे सर्व खिडक्या व्यवस्थित झोपवल्या. अगदी गंभीरपणे आपल्या कामाची प्रगती जरा जास्तचं तांत्रिकपणे समजावतं त्यानं काम संपवायला अजून वेळ लागेल हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. प्रोग्रॅममध्ये काहीतरी गडबड असल्याने संगणकावर काही दाखवणे शक्य नसल्याचे ठासून सांगितले.
व्यवस्थापक गेल्यावर आपले जीमेलवर अकाउंट असल्याचे अचानक त्याला आठवले. आणि जीमेलचे संकेतस्थळ उघडले आणि पत्रपेटी तपासली. पण तिथही अपेक्षेप्रमाणे काही नव्हतचं.
पस्तिसाव्यांदा गुगल टॊक उघडण्याचा प्रयत्न केला. चुकून जालप्रशासकाकडुन काही मुभा दिली गेली असावी अशी आशा उगाचच त्याला वाटली आणि म्हणून त्याने एक दोनदा प्रयत्न केला. सर्व आंतरजालाच्या एक्सप्लोरर खिडक्या बंद करता करता, काम सुरू करायच्या आधी अखेरीस एकदा ऒर्कुटचं पान ताजतवानं करून बघायला तो विसरला नाही. सदैव जिवंत (आणि हॅपनिंग वगैरे..) असणाऱ्या आंतरजालावर आपल्याच बाबतीत काही विशेष घडत नाही आणि आपणच एवढे दुर्लक्षिले जाऊ शकतो ही जाणीव पुन्हा एकदा थंडपणे, निर्विकारपणे, अगदी काम्युच्या आउटसायडर मधल्या नायकाइतक्या निर्विकारपणे त्याने स्वीकारली आणि तो डोके प्रोग्रॅममध्ये खुपसून बसला.
डोके बधिर झाले आहे असे वाटेपर्यंत त्याने प्रोग्रॅममध्ये वाकडे तिकडे बदल केले आणि प्रोग्रॅम आधीपेक्षा चांगला चालतो आहे असं उगाचच स्वतःचं समाधान करून घेतलं. आणि त्या आवेशात संघनायकाला त्या अर्थाचं पत्र पाठवून उलटतपासणी करण्याचं सुचवलं.
ऒफिसच्या दुसऱ्या टोकाच्या लांबच्या स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर त्याला खूप वेळ होऊन गेला असं वाटलं. काम करून थकल्याची भावना उगाचच दाटून आली. बराच वेळ आपण आंतरजालापासून लांब असल्याचं जाणवून त्याच्या बोटांनी एखाद्या समंजस मित्राप्रमाणे सराईतपणे एक्सप्लोररची खिडकी उघडली आणि....

Thursday, May 3, 2007
फ्रेंच चित्रपट "The ax" ("Le couperet")
एक माणूस आपल्या गाडीतून एकाला उडवून आणि चाकाखाली चिरडून खून करतो. हॊटेल रूममध्ये येऊन जबरदस्त अस्वस्थ मनस्थितीत अंघोळ करतो आणि स्वतः:चा कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करायला लागतो. या कबुलीजबाबामधून कथेचा पहिला भाग उलगडत जातो. तो एक कागद उद्योगातला उच्चपदस्थ व्यावसायिक होता. त्याला काही दिवसापूर्वीच त्याच्या कंपनीने खर्चकपात (cost cutting), एकीकरण (merger) अशी कारणे दाखवून पंधरा महिन्यांचा पगार देऊन काढून टाकलेले असते (lay off). सुरुवातीला त्याला असा विश्वास असतो की आपल्याला लगेच दुसरे काम मिळेल. पण सुमारे अडीच वर्ष प्रयत्न करूनसुद्धा काम न मिळाल्याने त्याचा धीर सुटायला लागतो. आणि अशा मनस्थितीत त्याच्या डोक्यात एक भयंकर कल्पना येते. इच्छीत पद प्राप्त करण्यासाठी त्याच्यापेक्षा लायक पाच-सहा उमेदवारांचा काटा काढून, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा खून करून स्पर्धा कमी करायची. तर हा चित्रपट आहे त्याच्या या कामगिरीचे खिळवून ठेवणारे चित्रण. दुसऱ्या खुनानंतर त्याला अपराधी वाटून चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवलेला कबुलीजबाब ध्वनिमुद्रित करतो. पण नंतर तो त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडतो व बाकी सर्व खुनांचा बेतसुद्धा अमलात आणतो. तर अशी ही भन्नाट कथा. यामध्ये एक छोटंसं उपकथानक पण आहे, त्याच्या मुलाच्या चोरीचं. तसेच पोलीस त्याला त्याच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या खुनाची माहिती एक संबंधित म्हणून द्यायला येतात तेव्हा आपली एक संशयित म्हणून चौकशी करायला आले असतील असे वाटून त्याची भंबेरी उडते. घरातल्या सर्व सदस्यांपासून लपवून योजना अमलांत आणताना झालेली त्याची तारेवरची कसरत, या सर्व प्रकारांमध्ये उडालेली धांदल, पण निवडलेल्या मार्गाबद्दल असलेला त्याचा ठामपणा या सर्वांचा एक जबरदस्त वेगवान कोलाज म्हणजे हा थरारपट.
हा चित्रपट डोनाल्ड वेस्टलेक नावाच्या अमेरिकन लेखकाच्या "The ax" या कादंबरीवर आधारीत आहे. मुळात रहस्यकथा या स्वरूपात लिहिलेल्या कादंबरीला कोस्टा गावरास या फ्रेंच दिग्दर्शकाने ब्लॅक कॊमेडी या स्वरूपात पेश करून भांडवलशाहीच्या नफेबाजीच्या अमानुष वाटचालीवर एक जळजळीत सामाजिक व राजकीय भाष्य केले आहे.
नायक झालेल्या जोस गार्सिया या कलाकाराने भूमिका अगदी समरसुन निभावली आहे. चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही आणि नक्कीच विचार करायला लावतो.

Wednesday, May 2, 2007
गो. नी. दाण्डेकरांच्या "कहाणीमागची कहाणी"
"कहाणीमागची कहाणी" या पुस्तकांत गो. नी. दाण्डेकरांनी (गोनीदा) आपल्या लेखनाबद्दल, निर्मितीप्रक्रियेबद्दल वेळोवेळी लिहीलेले लेख आहेत. तसेच त्यांनी वाचकांच्या पत्रानां दिलेली उत्तरे व त्यांची "मॅजेस्टीक गप्पा" या कार्यक्रमांतर्गत घेतलेली मुलाखत या पुस्तकामधे आहे.
गोनीदांच पहिलं पुस्तक कोणतं वाचलं ते आता आठवत नाही (कदाचित "माचीवरला बुधा" किंवा "जैत रे जैत" असावं.) तेव्हापासुन गोनीदा आवडते लेखक झाले. भोवतालच्या निसर्गाचे सहज आणि सोपे वर्णन करीत वाचकाला गोष्ट सांगण्याची त्यांची शैली पहिल्यापासून आवडली. त्यावेळी लागोपाठ त्यांच्या "माचीवरला बुधा", "जैत रे जैत", "मृण्मयी", "शितु", "स्मरणगाथा" व अगदी अलिकडे "रानभुली" या पुस्तकांचे वाचन झाले.
गोनीदांचा संत साहित्याचा प्रदीर्घ अभ्यास, संत गाडगेबाबांचा सहवास, नर्मदा परिक्रमा इत्यादींनी परिपुर्ण असलेले विलक्षण जीवन यामुळे गोनीदांच्या लिखाणाला एक अध्यात्मिक खोली प्राप्त झाली आहे. याचा पुरेपुर अनुभव "मृण्मयी", "माचीवरला बुधा" वाचताना येतो. मानवी संबंधाबद्दलची एक प्रगल्भ जाणीव त्यांच्या पात्रांमधुन उठुन दिसते.
तसेच निसर्गावरील अनुभवसिद्ध प्रेमामुळे त्यांच्या कादंबऱ्यामध्ये डोकावणारा निसर्ग नुसताच पार्श्वभुमीपुरता मर्यादित न राहता तो कादंबरीतील पात्राचीही भुमिका निभावतो. "अनुभवसिद्ध" अशासाठी म्हटले कारण गोनीदांनी आपल्या कादंबऱ्यामधील वातावरण हुबेहुब यावे यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुंमध्ये वास्तव्य केले व पात्रांचे राहणे स्वत: जगुन मग लिहीले.
तर गोनीदांच्या लेखनातील या व यासारख्या अनेक गुणवैशिष्ट्यांची चिकित्सा "कहाणीमागची कहाणी" मधे आहे आणि हे सर्व त्यांच्याच शब्दांत वाचल्यामुळे त्यांची पुस्तके पुन्हा वाचण्याची इच्छा झाली आहे हे निश्चितचं.

सात सक्कं त्रेचाळीस, किरण नगरकर
१९७४ नंतर थेट २००४ मध्ये दुसरी आवृत्ती निघालेली ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दुर्लक्षित राहिली. कठोर समिक्षेमुळे तिला मराठीत जनाधार लाभला नाही व तिची घोर उपेक्षा झाली. आणि मोठा विरोधाभास असा की ह्याच कादंबरीच्या इंग्रजी आवृत्तीला काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले. हे सर्व विद्युत भागवत यांच्या प्रस्तावनेत नमुद करण्यात आले आहे. (ता.क. अलिकडेच किरण नगरकर यांच्या "ककल्ड" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.)
तर ही कथा आहे, "कुशंक पुरंदरे" नावाच्या युवकाची.
कादंबरीत फ़्लॅशबॅक आणि जंपकट्स तंत्रांचा वापर आहे.
सुसुत्रता नसलेली, मानवी जीवनाची निरर्थकता-असंबंद्धता दर्शविणारी, स्त्री-पुरुष संबंधांची अनेक गुंतागुंतीची रुपे दाखविणारी, महानगरीय अस्तित्ववादी-शुन्यवादी जीवन चितारणारी अशी अनेक वैशिष्ट्ये या कादंबरीच्या वर्णनार्थ वेगवेगळ्या समीक्षणात आली आहेत.
पण कादंबरी एकदम भन्नाट वाटली. वाचताना "कोसला" ची आठवण झाली. यातील "कुशंक"बरोबरचं "तु" आणि "रघु" ही पात्रं विशेष आवडली. "आरोती" बरोबरचे प्रसंग आणि त्यांचे संवादसुद्धा आवडले. भाऊ पाध्यांनी म्हटल्याप्रमाणे या कादंबरीने नक्कीच मस्तक गरगरवुन टाकलं.

मिलिन्द बोकिल यांचा कथासंग्रह "उदकाचिया आर्ती"
प्रामुख्याने कार्यकर्त्या व्यक्ती, त्यांचे कार्य, आजुबाजुच्या व्यक्तींशी आलेले त्यांचे संबंध तसेच व्यक्तिगत ताणतणाव यांचे वेगवेगळे रंग या कथांमधुन आले आहेत. (अपवाद: कथा "विदेश" आणि "दुपार" यामध्ये कार्यकर्त्या व्यक्ती नाहीत.)
सर्वच कथांमधुन भावभावनांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजचे सामाजिक वास्तव प्रखरपणे कधी पार्श्वभुमीच्या रुपाने तर कधी मुळ आशयामध्ये सर्वच कथांमधे आढळते.
"भूमी" वगळता सर्वच कथांना स्त्री-पुरुष संबंधाचे परिमाण आहे.
मानवी मनोव्यापाराचे वेध घेणाऱ्या ह्या कथा तत्कालिन सामाजिक वास्तवाच्या संदर्भामुळे अगदी खऱ्या वाटतात व नक्कीच वाचनीय आहेत.
"चक्रव्युह" ही कथा त्यातल्या क्लायमॅक्समुळे आणि "भावी इतिहास" त्यातल्या नायकाच्या चित्रणामुळे विशेष आवडल्या.

Thursday, April 19, 2007
भाऊ पाध्यांची "अनिरुद्ध धोपेश्वरकर"..
खुपच वेगळा आणि अवघड विषय आहे ह्या कादंबरीचा. "अनिरुद्ध"च्या मनातली "अनावश्यकतेची" भावना आजच्या संगणक युगात खुप जणांना अतिशय तिव्रतेने जाणवत असेल. त्या पार्श्वभुमीवर ह्या कादंबरीतील घटना आणि कथानकाचा प्रवाह नक्कीच विचार करायला लावणारा आहे. प्रथमपुरुषी निवेदनाद्वारे ज्या साधेपणाने ही कथा मांडली आहे तेही उल्लेखनीय आहे. कथानक स्पष्ट करण्यासाठी पुस्तकाच्या मलपृष्ठावरचाच भाग मी येथे देतो (आभार: पॊप्युलर प्रकाशन):
"अनिरुद्ध धोपेश्वरकर नावाच्या एका बॅरिस्टरची ही गोष्ट. अंतर्मन, भावना वगैरे गोष्टींचा फारसा रोमॅंटिक घोळ न घालणाऱ्या ह्या माणसाला आपल्या अनावश्यकतेची जाणीव होते. तोपर्यंत अंगाखांद्यावर लग्नाची, बॅरिस्टरकीची, मैत्रीची अशी अनेक गुंतागुंतीची वस्त्रे चढलेली असतात. आपली प्रतिष्ठा, इभ्रत, आपल्याविषयी लोकांचे चांगले समज तयार करायला खपूनखपून जगणे, वेश्येच्या शरीराप्रमाणे आपल्या भावनांकडे येणाऱ्याजाणाराचे लक्ष ओढणे, पांढरपेशे संबंध टिकविण्याकरता चारचौघांत जाणे - ह्या सगळ्या गोष्टींच्या भंपकपणाने तो हळूहळू मोकळा व्हायला लागतो. त्याच वेळी काहीही करावे पण कुणाचे फारसे वाईट करु नये अशा वागण्याने तो दोन मुलींच्या लफड्यात सापडतो. आपण निरपराध असतानाही तो आपल्यावर घेतलेले आळ अमान्य करत नाही - अन असा बाहेरच्या गुंत्यात तो जसजसा अडकत जातो तसतसा आतून त्यापासून मोकळा होत जातो. "

Tuesday, April 17, 2007
पंकज कुरुलकरांची "जंगल"..
पंकज कुरुलकरांची "जंगल" कादंबरी कालच वाचुन संपली. लेखक-उद्योजक राघव, त्याची बायको सुनिता आणि त्याची सेक्रेटरी मैथिली या तिघांमधील परस्परसंबंधाची हि कथा. लेखकाने या संबंधामधील लैंगिक गुंतागुंत बेधडकपणे मांडली आहे. तिघांच्या प्रथमपुरुषी निवेदनातुन पुढे सरकत लेखकाने तिघांच्या मानसिक प्रवासाचाही धांडोळा घेतला आहे. कथानक तसं काही नविन नाही. नेहमीचीच "पती, पत्नी और वोह" ह्या धाटणीचे आहे. पण नव्या युगाच्या अनुषंगाने ते चांगले फुलवले आहे. स्री-पुरूष संबंधाच्या विषयाला इतक्या थेटपणे भिडणारी ही कादंबरी नक्कीच वाचनीय आहे. आता कुरुलकरांच्या इतर लिखाणाबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)