टाईमपास
चित्रपट रिलीज होऊन बरेच दिवस झाले आणि तो अजुनही एकदम धडाक्यात चालु आहे. तर फॅंड्री
(नावाचा मराठीच चित्रपट) रिलीज व्हायला अजुन दोन आठवडे आहेत. पण या दोन्ही
चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी ढवळुन टाकली आहे.
नटरंग
मधुन व्यावसायिक सिनेमाची नस शोधलेल्या रवि जाधवांनी बालक पालक सारखा धाडसी प्रयोग
केल्यानंतर टाईमपासद्वारा षटकारच ठोकला आहे.
नाव
टाईमपास असलं तरी तो दुनियादारीइतका सवंग तर नक्कीच नाहीये. कथा, पटकथा,
दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय अशा सगळ्याच पातळ्यांवर आम जनतेची पसंती मिळवलेला हा
चित्रपट पहिल्या प्रेमाच्या विषयाकडे एका सामाजिक दृष्टीकोनातुन बघतो आणि त्यातही
समतोलपणा राखतो हे नक्कीच उल्लेखनीय आहे. मग ते दोघांच्या वडलांच्या भेटीचा प्रसंग
असु देत किंवा शेवटी दगडुच्या प्राजुच्या घरातला झडतीचा प्रसंग असु दे, संवादावर
घेतलेले कष्ट नक्कीच जाणवतात. अनेक ठिकाणी उगीचचा बटबटीतपणा टाळल्यामुळे, नायक
नायिका दोघे वयाने लहान वाटले तरी, हि लव्हस्टोरी मनात घर करुन जाते. दोघांच्या
वागण्या बोलण्यातली निरागसता आणि त्याचवेळी मोठ्यांचा समजुतदारपणा हा या कथेला एका
प्रगल्भतेच्या पातळीवर नेऊन पोचवतो.
टाईमपासच्या
व्यावसायिक यशाचे पडघम अजुन काही दिवस वाजत राहतील तितक्यात पुढच्या महिन्यात “व्हॅलेंटाईन डे” लाच फॅंड्री रिलीज होतो आहे.
अनेक
चित्रपट महोत्सवातुन प्रशंसा झालेला हा चित्रपट नागराज मंजुळे या नवख्या पण
तेवढ्याच ताकदीच्या दिग्दर्शकाने बनवलेला आहे. पिस्तुल्या नावाच्या लघुपटासाठी मंजुळेना
2011 मधे “सर्वोत्तम पहिला लघुपट” कॅटेगरीतला राष्ट्रीय पुरस्कार
मिळाला.
फॅंड्रीमधुन
त्यांनी पौंगडावस्थेतील प्रेमभावनेच्या विषयाला हात घातला आहे. पण त्यांच्या कथेचा
परिघ, मांडणी आणि धाटणी टाईमपासपेक्षा खुपच वेगळी आहेत. ग्रामीण पार्श्वभुमीवरच्या
ह्या प्रेमकथेलादेखील भक्कम सामाजिक संदर्भदेखील आहे. आणि मिळालेले अनेक पुरस्कार फॅंड्रीच्या
चित्रपटशास्त्रीय गुणवत्तेचे निदर्शक आहेतच.
अजुन
काही आताच सांगणे उचित होणार नाही. युट्युबवर त्याचे ट्रेलर्स आले आहेत. मीपण फॅंड्री
चित्रपट अजुन पाहिलेला नाही पण ज्यांनी पाहिला त्या मित्रमंडळीना ऐकल्यानंतर या
दोन्ही चित्रपटांबद्दल एकत्र लिहीण्याची इच्छा तीव्र झाली.
तेव्हा फ्रेंड्स फॅंड्रीपण
पाहायला विसरु नका आणि तुमचे अभिप्राय मला जरुर कळवा.
No comments:
Post a Comment